नाशिक: ऑनलाईन फसवणूक झालेले दीड लाख मिळाले परत; तक्रारदाराने मानले सायबर पोलिसांचे आभार

नाशिक (प्रतिनिधी): अंबड परिसरातील एकाला क्रेडीट कार्डवरून संशयित ऑनलाईन भामट्याने सुमारे दीड लाखांना परस्पर गंडा घातला होता.

मात्र त्यांनी सायबर पोलिसांकडे तात्काळ तक्रार करीत पाठपुरावा केल्याने भामट्याने गंडा घातलेले पैसे पुन्हा तक्रारदाराच्या बँक खात्यात वर्ग करण्यात नाशिक सायबर पोलिसांना यश आले. यामुळे तक्रारदाराने सायबर पोलिसांचे आभार मानले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक शहरातील सहायक पोलीस आयुक्तांची खांदेपालट

अतुल गोविंदा सोनार (रा. मोरवाडी, अंबड) यांची गेल्या ३० मे रोजी ऑनलाइन फसवणूक झाली होती. संशयित ऑनलाईन भामट्याने सोनार यांच्या क्रेडीट कार्डचा वापर करून त्यावरून १ लाख ४८ हजार ८९४ रुपये परस्पर काढून घेतले होते.

सदरची बाब लक्षात येताच सोनार यांनी तातडीने नाशिक सायबर पोलिसांशी संपर्क साधत तक्रार केली. त्यानुसार सायबर पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, प्रभारी निरीक्षक रियाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सायबरचे अंमलदार संतोष गोसावी, केद्राबाई पठारे, सोनाली गुंजाळ यांनी तातडीने तांत्रिक विश्लेषण करून आर्थिक व्यवहार झालेल्या कंपनीस ई-मेल करीत व्यवहार थांबविले.

⚡ हे ही वाचा:  नाशिकमध्ये जोरदार पावसाची हजेरी; तीन तासांत १०.४ मिमी पावसाची नोंद, आज (दि. २६) यलो अलर्ट कायम

त्यानुसार सततच्या पाठपुराव्यामुळे भामट्याने केलेले आर्थिक व्यवहार थांबविण्यात आले. त्यानंतर सोनार यांना १ जुलै रोजी त्यांचे पैसे त्यांच्या बँक खात्यात वर्ग झाल्याने त्यांना पुन्हा मिळाले. याबाबत सोनार यांनी नाशिक सायबर पोलिस ठाण्यात जाऊन अधिकारी-कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here