नाशिक: मूर्ती संकलन करणाऱ्या ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): पंचवटीतील गंगाघाटावरील म्हसोबा महाराज पटांगण परिसरात महापालिकेच्या मूर्ती संकलन केंद्र म्हणून फिरणाऱ्या वाहनाने धडक दिल्यामुळे या परिसरात फिरस्ता असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर ट्रकचालक गाडी सोडून फरार झाला होता, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंत चतुर्दशीनिमित्त गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी महानगरपालिकेने जागोजागी कृत्रिम तलाव तयार करण्यात आले होते तर, काही ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र तयार करण्यात आलेले आहेत. असेच मूर्ती संकलन केंद्र म्हसोबा महाराज पटांगण परिसरात खाजगी ट्रक क्रमांक एम एच १५ एफ व्ही८१२ या गाडीमध्ये करण्यात आले होते.
ती गाडी या ठिकाणी येत असताना या परिसरात फिरस्त्या पुरुष व्यक्तीला या गाडीने जोरदार धडक दिली आणि ही व्यक्ती गं’भी’र जखमी झाली त्यानंतर ती घटना येथे असलेल्या पोलिसांना समजली पोलिसांनी तातडीने रुग्णवाहिका बोलून या फिरस्ता जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीने शासकीय रुग्णालयात पाठविले परंतु ज्या ठिकाणी डॉक्टरांनी या व्यक्तीला मृत म्हणून घोषित केले आहे. दरम्यान यातील ट्रक चालक हा ट्रक सोडून पळून गेला होता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
👉 इथे किराणा मालावर मिळतोय मोठा डिस्काउंट.. त्वरा करा !