नो हेल्मेट, नो पेट्रोल आदेशाचे उल्लंघन; पंचवटीतील ‘या’ तीन पेट्रोलपंपांना नोटिसा

नो हेल्मेट, नो पेट्रोल आदेशाचे उल्लंघन; पंचवटीतील ‘या’ तीन पेट्रोलपंपांना नोटिसा

नाशिक (प्रतिनिधी): पंचवटीतील तीन पेट्रोल पंपावर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्या नो हेल्मेट, नो पेट्रोल आदेशाचे उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी गांधी, पालीजा आणिखालसा या तीन पेट्रोलपंपांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तुमचे ना हरकत प्रमाणपत्र का रद्द करु नये, अशी पोलिसांनी विचारणा केली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: सोन्याचं मंगळसूत्र केलं परत; महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा !

या कारवाईमुळे नो हेल्मेट, नो पेट्रोल आदेशाचे उल्लंघन करणार्‍या शहरातील पेट्रोल पंपचालकांचे धाबे दणाणले आहेत.

पोलीस आयुक्त दीपक पांण्डेय यांनी शहरात नो हेल्मेट, नो पेट्रोल’ही मोहीम सुरु केली आहे. विनाहेल्मेट दुचाकीचालकांना पेट्रोल देवू नये, असे आदेशात म्हटले आहे. मात्र, अनेक पेट्रोल पंपचालक आदेशाचे उल्लंघन करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी त्यांच्या पथकासह स्वत: जाऊन तीन पेट्रोल पंपांवर धडक कारवाई करुन त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नोटीसा बजावलेल्या पेट्रोल पंपांमध्ये एन एल गांधी पेट्रोल पंप, खालसा पेट्रोल पंप आणि पी जी पालेजा पेट्रोल पंप यांचा समावेश आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790