नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): देवळालीगाव वालदेवी नदीकिनारी असणाऱ्या रोकडोबावाडी येथील शिवाजी पुतळ्याजवळ अरमान शेख नामक युवकावर वार करण्यात आले.
मंगळवारी रात्री उशिरा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मंगळवारी (ता. ७) रात्री साडेदहाला अरमान शेख नामक युवक रस्त्यावरून चाललेला असताना नाशिक रोड येथील कोयताधारी हल्लेखोरांनी शेखच्या मागून येत सपासप वार केले.
रस्त्यावर रक्ताचा सडा पडला. जखमी शेखचा मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. त्यास बिटको रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. घटनेची वार्ता परिसरात समजताच खळबळ उडाली. या प्रकारामुळे रात्री शतपावली करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, नाशिक रोड परिसरात सध्या कोयता गँगची दहशत वाढत चालली आहे. उपनगर पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत असल्याचे सूत्रांनी सांगितले.