नाशिक (प्रतिनिधी): नाशिकरोड व परिसरात होणाऱ्या घरफोडी प्रकरणातील तीन संशय ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 25 तोळे सोन्यासह सुमारे 17 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात नासिकरोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला मोठे यश मिळाले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली. त्यांच्या या कारवाई बद्दल समाधान व्यक्त होत आहे.
नाशिकरोड जेलरोड व परिसरात मोठ्या प्रमाणात घरफोड्या झाल्या होत्या.अनेक ऐवज यात भामट्यांनी चोरून नेला होता. त्याचा शोध सुरू असताना व घरफोडी झालेल्या ठिकाणाचा सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर ओळख पटवण्यात आली. त्यातील दोन संशयित हे सिन्नर फाटा येथील बस डेपो या ठिकाणी येणार असल्याची माहिती नाशिकरोड पोलीस ठाण्यातील गून्हे शोध पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी सापळा रचण्यात आला व पोलिसांनी भगूर येथील अफजल हुसेन सय्यद व महात्मा नगर, नाशिक येथील विकी उर्फ विकास सुधाकर पाटेकर या दोन युवकांना ताब्यात घेऊन त्यांचा तिसरा साथिदार निलेश विनायक कोळेकर (रा.अंबड) या चोरट्यांना शिताफीने ताब्यात घेतली. त्यांच्याकडून 15 लाख 93 हजार 750 रुपये किमतीचे 25 डोळे सोने, 11 000 रुपये किमतीचे 120 ग्रॅम चांदीचे दागिने, 70 हजार रुपये किमतीची यामाहा दुचाकी व चोरी करण्यासाठी वापरण्यात येणारे हत्यार ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार अफजल सय्यद वर 12, विकास पाटेकर वर 10 तर निलेश कोळेकर वर 06 गुणांची नोंद विविध पोलीस ठाण्यात आहे. चोरीचे दागिने हे चोरटे साराफांकडे गहाण ठेवून त्यावर पैसे मिळवत असे.
सदरची उल्लेखनिय कामगिरी नाशिकरोड पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी, पोनि विश्वजीत जगताप तसेच गुन्हे शोध पथकाचे सपोनि प्रविण सुर्यवंशी, पोउनि संदिप पवार, पोह अविनाश देवरे, पोह विजय टेमगर, पोह विष्णु गोसावी, पोह संदिप पवार, पोशि महेंद्र जाधव, पोशि संतोष पिंगळ, पोशि गोकुळ कासार, पोशि सागर आडणे, पोशि अरूण गाडेकर, चापोशि योगेश रानडे, पोशि विशाल कुंवर, पोशि समाधान वाजे, पोशि नाना पानसरे, पोशि रोहित शिंदे व पोशि अजय देशमुख, पोशि भाउसाहेब चत्तर, पोशि निलेश वराडे यांनी कामगिरी पार पाडली.