नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात दिवाळीनिमित्त बंद्यांनी साकारलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केंद्र

नाशिक। दि. १७ ऑक्टोबर २०२५: बंद्यांनी तयार केलल्या वस्तू उत्तम, सुंदर व कौतुकास्पद असून त्यांनी बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री हा त्यांच्या कलागुणांना प्रोहत्सान देणारा अभिनव उपक्रम आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह येथे दिवाळी मेळावा प्रसंगी बंदी निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केंद्रचे उद्धाटन जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी कारागृह अधीक्षक अरूणा मुगुटराव, तुरूंगाधिकारी श्रीमती वाय गुजराथी, कारागृह उप अधीक्षक सचिन चिकणे, प्रकाश परदेशी, स्वीय सहाय्यक रवींद्र कोष्टी, वरिष्ठ तुरूंगाधिकारी तथा कारखाना व्यवस्थापक एस एस कांबळे, सीताराम जोपळे, संजय रघुते, शेखर शिरीसकर, भगवान महाले यांच्यासह कारागृहातील अधिकारी, कर्मचारी व बंद्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: धोकादायकरीत्या उभ्या ट्रकला कारची धडक; तीन वर्षांच्या चिमुकलीसह चौघे जखमी

जिल्हाधिकारी श्री. प्रसाद म्हणाले की, बंद्यांनी तयार केलेल्या वस्तू त्यांना नवीन जीवनाची संधी निर्माण करून देण्यासाठी प्रेरणादायी आहेत. नागरिकांनी बंद्यांनी तयार केलेल्या विविध वस्तू जास्तीत जास्त प्रमाणात खरेदी करून बंद्यांना समाजात पुनर्स्थापित होण्यासाठी दुसरी संधी उपलब्ध करून द्यावी.

कारागृह अधिक्षक श्रीमती मुगुटराव यांनी प्रास्ताविकातून कारागृहातील बंद्यांकारीता चालणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती तसेच वस्तू उत्पादन व विक्री याबाबत माहिती दिली. सदर विक्री प्रदर्शनात पणती, दिवे, लोखंडी पणती स्टँण्ड, लाकडी कपाट, बैलगाडी, बस पट्टी, लाकडी खुर्ची, लोखंडी पलंग, बेकरी उत्पादने, आकाश कंदिल इत्यादी बंदी निर्मित वस्तू ठेवण्यात आल्या आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790