🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिकमध्ये तापमानात घट; किमान तापमान ११.४

नाशिक। दि. १९ जानेवारी २०२६: शहर व परिसरात गुरुवारपासून तापमानात घट होऊ लागली आहे. शनिवारपाठोपाठ रविवारी सायंकाळी वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे वातावरणात गारठा निर्माण झालेला जाणवू लागला आहे.

आज (दि. १९) किमान तापमान ११.४ इतके नोंदवले गेले. गेल्या बुधवारपासून तर आजपर्यंत ३.७ अंशांनी किमान तापमानात घट झाली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: बाबाज थिएटर्सतर्फे आज (दि. ६) 'मेरी आवाज ही मेरी पहचान है' मैफल !

नाशिक शहरात मागील आठवड्यात तापमानाचा पारा काहीसा वाढलेला होता. वातावरणात गारठा कमी झाल्याचा अनुभव नागरिकांना येत होता. संक्रांतीपासून वातावरण पुन्हा बदलू लागले आहे.

त्यामुळे वातावरणात आता सकाळी व सायंकाळी सुद्धा गारवा जाणवत आहे. रविवारी सकाळी आर्द्रतेचे प्रमाणदेखील वाढलेले राहिले. आज सुमारे ९१ टक्के इतकी आर्द्रता मोजण्यात आली. मागील तीन दिवसांपासून आर्द्रतेमध्ये सकाळी वाढ होत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790