नाशिक (प्रतिनिधी): उत्तरेकडील वारे वाहण्यास सुरुवात झाल्याने, तापमानात काही अंशांनी घट होत असल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
गेल्या ५ दिवसांत साधारणपणे एक ते दीड अंश सेल्सिअसने तापमानात घट झाली असल्याने सकाळी आणि रात्री थंडी जाणवते. दुपारी मात्र कड़क उन्हामुळे शहरवासीय घामाघूम होत आहेत. आगामी दोन दिवस शहरात गारवा राहणार असून १३ ते १५ नोव्हेंबरदरम्यान ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. तसेच शहराच्या आजूबाजूला हलक्या पावसाचा अंदाज नागपूर हवामान वेधशाळेने अंदाज वर्तविला आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच एरवी नाशिकमध्ये थंडीला सुरुवात होते.
यंदा मात्र थंडीही पावसासारखी पुढे सरकली असली तरी आता हवेत गारवा निर्माण होत आहे. मंगळवारी (दि. १२) किमान १३.७ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. शहरात रविवारी रात्री वातावरणात गारवा निर्माण झाला होता. नागरिक ऊबदार कपड्यांमध्ये दिसले तर काही ठिकाणी शेकोट्याही पेटल्या होत्या.