नाशिक। दि. २९ ऑक्टोबर २०२५: हवामान विभागाने जिल्ह्यासाठी पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला असला तरी पावसाचा जोर कमी होत चालल्याचा प्रत्यय येतो आहे. मंगळवारी (दि. २८) शहरात पावसाने उघडीप दिल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.
जिल्ह्यात देखील पावसाचे प्रमाण कमी झाले असून, १५ तालुक्यांमध्ये ७.४ मिमी पाऊस नोंदविला गेला आहे. पुढील दोन दिवस देखील जिल्ह्यासह घाट माथ्यावर यलो अलर्ट वर्तविण्यात आला आहे.
पावसाचा हंगाम संपून महिना पूर्ण होतो आहे. हिवाळा ऋतुला सुरुवात झाली असून, मध्यंतरीच्या काळात थंडीची चाहूलही लागली. परंतु, असे असले तरी दिवाळीपूर्वी मराठवाडा, विदर्भ, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्राला अवकाळी पावसाने झोडपून काढले. कधी नव्हे ते धो धो अतिवृष्टी झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
दिवाळीत सुदैवाने पावसाने उघडीप दिली. परंतु, त्यानंतर पावसाने पुन्हा धुडगूस घालण्यास सुरुवात केली आहे. गेले तीन-चार दिवसांपासून पावसाने शहरासह जिल्ह्यात मुक्काम ठोकला आहे. परंतु, दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी होत चालला आहे.
![]()

