नाशिक। दि. २० डिसेंबर २०२५: शहरासह जिल्ह्यात थंडीची लाट आल्यानंतर आज यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमानाची ६.९ अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली. यापूर्वी काल तापमानाचा पारा ७.४ वर आला होता. गेल्या ८ दिवसांत शहरात किमान तापमानाचा पारा तब्बल ५ अंशांपेक्षा जास्त घसरला आहे.
तर निफाडमध्ये आज निचांकी ४.५ अंश इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. उत्तर भारतातून एकापाठोपाठ मार्गक्रमण करणाऱ्या पश्चिमी झंझावात प्रकोपामुळे थंड वारे राज्याकडे झेपावत आहेत.
यामुळे थंडीची तीव्रता वाढविण्यासाठी अनुकूल अशी वातावरणीय स्थिती सध्या निर्माण झाली आहे. यामुळे मुंबईसह कोकणाचा भाग वगळता राज्यात सर्वच शहरे गारठली आहेत. मागील महिन्यात निफाडचे तापमान ७ अंशांपर्यंत खाली आले होते. त्यानंतर मागील आडवठ्यात शुक्रवारीही निफाडचा पारा ७ च्या खाली आला होता.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळांमुळे पहिल्या आठवड्यात तापमानात चढ-उतार पाहावयास मिळाला होता. त्यातच उत्तरेत सुरू झालेली बर्फवृष्टी आणि थंड वारे वाहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.
![]()

