🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

Apollo

नाशिक: तापमानाचा पारा घसरला; २४ तासांत तापमानात दोन अंशांची घट

नाशिक। दि. ३ फेब्रुवारी २०२६: जिल्ह्यासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात आजपासून पुढील चार दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, काही ठिकाणी किरकोळ पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

दरम्यान, सोमवारी (दि. २) मागील २४ तासांत किमान तापमानात सुमारे १.८ अंश सेल्सिअसची घट नोंदविण्यात आली. किमान तापमान १३.८ अंश, तर कमाल तापमान २९.३ अंश सेल्सिअस इतके होते. पहाटे व रात्रीच्या वेळी गारवा जाणवत असून, ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दिवसभरात प्रखर ऊन किंवा निरभ्र आकाश जाणवले नाही.

🔎 हे वाचलं का?:  आदिवासी विकास विभागाकडून ४० तरुण-तरुणींना परदेशातील उच्च शिक्षणासाठी मिळणार शिष्यवृत्ती

अधूनमधून ढग दाटून येत होते आणि सूर्यप्रकाशाची तीव्रताही कमी होती. हवामान अभ्यासकांनी वर्तविलेल्या अंदाजानुसार नाशिक, सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, निफाड, सटाणा, कळवण, देवळा व मालेगाव या तालुक्यांतील काही भागांत येत्या दोन ते तीन दिवसांत तुरळक पावसाची शक्यता आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790