नाशिक (प्रतिनिधी): महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी आज बुधवार 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7 वाजेपासून मतदान प्रक्रिया सुरू असून जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात स्थापित वेब कास्टींग कक्षाद्वारे जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेचे 20 निरीक्षकांकडून काटेकोर निरीक्षण सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी दिली.
जिल्ह्यात 15 विधानसभा मतदारसंघात एकूण 4 हजार 922 मतदान केंद्रे असून यातील 3 हजार 280 मतदान केंद्रांवर बेव कास्टींग कक्ष कार्यान्वित करण्यात आले असून या सर्व मतदान केंद्रांवर मतदान केंद्राच्या बाहेर व आतील बाजुस प्रत्येकी दोन वेब कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील वेब कास्टींग कक्षाद्वारे कार्यान्वित 3 हजार 280 मतदान केंद्रांवर अनुचित प्रकार टाळण्याच्या दृष्टीने होणाऱ्या अनावश्यक गर्दी कमी करणे व मतदानाचा वेग वाढविण्याबाबत मतदान केंद्र प्रमुखांना आवश्यक सूचना देण्यात येत आहे.
आज मतदान प्रक्रिया संपेपर्यंत जिल्हातील प्रमुख वेब कास्टींग कक्षाद्वारे हे निरीक्षण सुरू राहणाार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. शर्मा यांनी दिली आहे.