नाशिक: नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार प्रा. देवयानी फरांदे यांच्या शोभायात्रेला मुंबई नाका येथून सुरुवात करण्यात आली. प्रचंड गर्दीत शोभायात्रेचे सर्वत्र स्वागत करण्यात आले.
माजी नगरसेविका सुमन भालेराव, अर्चना थोरात, माजी नगरसेवक संदीप लेनकर यांच्या नियोजनात शोभायात्रा झाली. सह्याद्री हॉस्पिटल चौक, सावित्रीबाई फुले शाळा, वृंदावन कॉलनी, गणपती मंदिर, कॅमल हाऊस, काठे गल्ली चौक, बनकर चौक, संत सावता माळी उद्यान, स्वामी समर्थ केंद्र, शंकरनगर चौफुली या परिसरात महिलांनी लाडक्या बहिणींचे स्वागत करून औक्षण केले.
प्रचार फेरीत प्रवीण तिदमे, तेजश्री काठे, नाना शिलेदार, हरिभाऊ जाधव, मिलिंद भालेराव, दत्ता शिंदे, शैलेश जुन्नरे, प्रमोद बनकर, बाळासाहेब काठे, लक्ष्मण अमृतकर, तुषार जुन्नरे, किरण आंबेकर, मंगेश नाईक, हर्षल पाठक, गणेश तांबे, नंदू उन्हाळे, लता वाघ, भारती पाटील आदी उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेवक संदीप लेनकर यांच्या नेतृत्त्वात भाभानगरला प्रा. आमदार देवयानी फरांदे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाले. यावेळी माजी नगरसेवक सुनील खोडे, तेजश्री काठे, जयंत पाटील उपस्थित होते
![]()


