आडगाव येथील आयटी पार्कसाठी आमदार देवयानी फरांदे यांचेच प्रयत्न- सतीश कुलकर्णी

विरोधकांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न

नाशिक: नाशिक शहरातील युवकांची गरज ओळखून आयटी पार्कचा प्रस्ताव मध्य नाशिक मतदारसंघाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे आणि तत्कालीन महापौर सतीश कुलकर्णी यांनी सर्वप्रथम मांडला होता. त्यास मंजुरी आणली होती. परंतु, प्रशासकीय राजवटीमुळे हा महत्त्वपूर्ण प्रकल्प प्रलंबित आहे. राज्यात महायुतीची सत्ता पुन्हा आल्यावर या प्रकल्पाला गती देण्यात येईल, असे फरांदे यांनी सांगितले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चोरीच्या पाच मोटारसायकलींसह आरोपी अटकेत; पाच गुन्हे उघडकीस

नाशिकमधील अनेक उच्चशिक्षित युवकांना नोकरीसाठी पुणे, बंगळुरू अशा शहरांमध्ये स्थलांतरित व्हावे लागते. नाशिकमध्ये आयटी पार्क नसल्यामुळेच युवकांची अशी ओढाताण होते. हीच बाब लक्षात घेऊन मध्य नाशिक मतदारसंघाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे आणि तत्कालीन महापौर सतीश कुलकर्णी यांनी आडगाव परिसरात आयटी पार्क उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी घेतली होती. या आयटी पार्कसाठी आडगाव शिवारात ३६५ एकर क्षेत्रात आयटी पार्क उभारण्यासाठी सर्वप्रथम महापालिकेची स्वमालकीची दहा एकर जागा आरक्षित करण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ.गेडाम यांच्या हस्ते ध्वजारोहण

त्यानंतर महापालिकेने मार्च २०२२ मध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयटी परिषदही घेण्यात आली. केंद्र सरकारने या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला असून, आयटी हब उभारण्यासाठी लागणाऱ्या सर्व सोयीसुविधांसाठी २० कोटी रुपये मंजूर केले. यासंदर्भातील पाठपुरावा अजूनही सुरू आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रजासत्ताक दिनानिमित्त उद्या (दि. २६) विविध कार्यक्रमांचे आयोजन

महायुतीचे सरकार येताच प्राधान्याने आयटी पार्कच्या दिशेने पावले टाकले जातील. भाजपने हा आयटी पार्क मंजूर केलेला असतानाही विरोधी पक्षातील नेते आपल्या भाषणांमध्ये नाशिकमध्ये आयटी पार्क करण्याबाबत दिशाभूल करणारी वक्तव्य करत आहेत, असेही कुलकर्णी यांनी सांगितले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790