
नाशिक (प्रतिनिधी): शेकडो मोटारसायकलस्वार युवक आणि असंख्य महिला कार्यकर्त्यांनी प्रभाग क्रमांक ७ चा परिसर दणाणून सोडला. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार प्रा. देवयानी फरांदे यांच्या प्रचारासाठी भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी १५० पेक्षा जास्त दुचाकी वाहने सहभागी झाली.

कमळ चिन्हाने सजवलेल्या प्रचाररथावर प्रा. देवयानी फरांदे यांच्यासह संयोजिका व भारतीय जनता पक्षाच्या नेत्या स्वाती भामरे, हिमगौरी आडके, माजी नगरसेवक योगेश हिरे, गोपाल राजपूत, निक्की पवार, मंडल अध्यक्ष वसंत उशीर, युवा मोर्चा अध्यक्ष अक्षय गांगुर्डे आदी नेते उपस्थित होते. अशोक स्तंभ येथे नाशिककरांचे श्रद्धास्थान असलेल्या ढोल्या गणपती मंदिरात दर्शन घेऊन प्रचारफेरीला प्रारंभ करण्यात आला.
प्रभाग ७ मधील रॉकेल गल्ली, घारपुरे घाट, मल्हार खाण, पोलिस हेड क्वार्टर, जुनी व नवीन पंडित कॉलनी, उत्कर्ष कॉलनी, मुरकुटे कॉलनी, बाल गणेश मंदिर येथे रॅली आल्यावर शिंदेसेनेचे अजय बोरस्ते व सहकाऱ्यांनी जोरदार स्वागत केले. यांनतर तिरुपती टाऊन, आनंदनगर, अथर्व मंगल कार्यालय, स्वामी समर्थ मार्ग, शहीद चौक, पाटील लेन क्रमांक ३ व ४, लक्ष्मीनगर येथे फेरी काढण्यात आली.
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790