नाशिक (प्रतिनिधी): विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे चार दिवस उरले असून आता प्रचारासोबतच उमदेवारांकडून मतदारांना विविध प्रकारचे प्रलोभने देण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत.
त्यावर निवडणूक निरीक्षकांसह पोलिसांचीही करडी नजर असल्याने आतापर्यंत रोकड, मद्य आणि इतर बाबींचा मिळून तब्बल ७३ कोटी ६० लाख ७० हजाराचा मुद्देमाल नाशिक विभागातील ५ जिल्ह्यांमध्ये जप्त करण्यात आला आहे. तर ४४५७ प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले असून सर्वाधिक १७१९ गुन्हे एकट्या नाशिक जिल्ह्यात दाखल करण्यात आले आहे.
जिल्हानिहाय जप्त मुद्देमाल (रक्कम लाख रुपयांत):
नाशिक ९९५.११, धुळे – १९५३.३२, जळगाव – ८९०.२५, नंदुरबार – ४१७.९२, अहिल्यानगर-3131.08
![]()
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790


