नाशिक: पूर्व विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार राहुल ढिकले यांच्या विजयासाठी म्हसरुळकरांनी एकमुखी ठराव केला आहे. ढिकले यांनी म्हसरुळ भागाच्या मळे परिसर व कॉलनीत विकासासाठी ५० कोटींपेक्षा अधिक निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्यांनी मंजूर केलेल्या कामांचे भूमिपूजन होऊन ते काम प्रत्यक्षात सुरूही झालेले आहे. म्हसरुळला गावसभा घेऊन ढिकलेंना शंभर टक्के मतदान करण्याची ठराव करण्यात आला.
म्हसरुळ गाव, बेलदारवाडी, राजवाडा, वैदूवाडी, कलानगर, गजपंथ सोायटी, वडजे मळा, पोकार कॉलनी, गायत्री नगर या परिसरात ढिकलेंनी पदयात्रा करून नागरिकांच्या भेटी घेतल्या. याप्रसंगी माजी महापौर रंजना भानसी, गटनेते अरुण पवार, माजी नगरसेवक वसंतराव मोराडे, रुंजा मोराडे, अमित घुगे, योगेश मोराडे, सोमनाथ वडजे, राहुल पवार, दीपक निकम, गणेश चव्हाण, रोहिणी दळवी, भास्कर बोरस्ते आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.