नाशिक: शहरात मोटारसायकलचोरांचा सुळसुळाट; चार मोटारसायकलींची चोरी

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहर आणि परिसरात वाहनचोरीचे सत्र सुरू असून, वेगवेगळ्या ठिकाणांहून चार मोटारसायकली अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याच्या नोंदी पोलीस ठाण्यात करण्यात आल्या आहेत.

मोटारसायकल चोरीचा पहिला प्रकार आडगाव हद्दीत घडला. फिर्यादी अंगद राममिलन गुप्ता (रा. हिराई आरटीओजवळ, नाशिक) यांनी आडगावजवळ असलेल्या विजयलक्ष्मी लॉन्सच्या पार्किंगमध्ये एमएच १५ ईएक्स ७४१७ या क्रमांकाची १५ हजार रुपये किमतीची मोटारसायकल पार्क केली होती. ही मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मोटारसायकलचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार ढाकणे करीत आहेत.

👉 हे ही वाचा:  नाशिक: मुलींच्या सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेत कंत्राटी पद भरतीसाठी 18 जुलै रोजी मुलाखतीचे आयोजन

चोरीचा दुसरा प्रकार अशोकस्तंभ येथे घडला. फिर्यादी आश्लेषा बाळासाहेब शिंदे (रा. संभाजीनगर, ध्रुवनगर, नाशिक) यांनी एमएच १५ डीबी १३४७ या क्रमांकाची दहा हजार रुपये किमतीची होंडा अॅक्टिव्हा स्कूटी अशोकस्तंभ येथील अॅक्सिस बँकेच्या एटीएमच्या पाठीमागील दुकानासमोर उभी केली होती. ही स्कूटी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस नाईक गायकवाड करीत आहेत.

👉 हे ही वाचा:  रेल्वेच्या 74 हजार डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे: रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची मंजुरी

मोटारसायकलचोरीचा तिसरा प्रकार चेतनानगर येथे घडला. फिर्यादी अक्षय गौतम भालेराव (रा. ओंकार अपार्टमेंट, चेतनानगर, नाशिक) यांनी चेतनानगरला हॉटेल कशिशच्या बाजूला एमएच १५ बीव्ही ५९१७ या क्रमांकाची २० हजार रुपये किमतीची मोटारसायकल पार्क केली होती. ही मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार आव्हाड करीत आहेत.

👉 हे ही वाचा:  नाशिक: ३० लाखांच्या कपड्याच्या मालाचा अपहार केल्याप्रकरणी दोघांना अटक !

मोटारसायकलचोरीचा चौथा प्रकार नाशिकरोड येथे घडला. फिर्यादी सुनील मुरलीधर कदम (रा. सौभाग्यनगर, विहितगाव, नाशिकरोड) यांनी मुक्तिधामच्या शेजारी असलेल्या स्टार मॉलच्या मागील बाजूस मोटारसायकल उभी केली होती. ही मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माळोदे करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790