नाशिक(प्रतिनिधी): पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नाने नाशिकच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात कोविड-१९ च्या स्वाब टेस्टिंग लॅब उभारली गेली होती. मात्र या लॅब मध्ये साहित्य उपलब्ध नसल्याने ही लॅब शुक्रवार पासून बंद आहे. उत्पादक आणि ट्रान्सपोर्ट यांच्या अडचणींमुळे पुरवठा होण्यास विलंब होत असल्याचा खुलासा जिल्हा प्रशासनाने केला आहे. साहित्य उपलब्ध झाल्यास कामकाज पुर्वरत सुरु करण्यात येईल अशी माहिती संस्थेच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार यांनी दिली.
जिल्ह्यातील कोरोन रुग्णसंख्या आणि पुणे तसेच धुळे येथील अहवालांचा वाढता लक्षात घेता हि लॅब उभारण्यात आली होती. या प्रयोगशाळेत रोज १८९ स्वाब नमुन्यांची तपासणी होत होती. मात्र चाचणीसाठी आवश्यक असलेले प्लास्टिक आणि त्यासंबंधी साहित्य नसल्याने हि प्रयोगशाळा सध्या बंद आहे.