नाशिक: राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत धनुर्विद्या अकादमीच्या खेळाडूंची चमक; दोन रौप्यपदकांची कमाई

नाशिक। दि.१५ मार्च २०२६: राज्यस्तरीय धनुर्विद्या (इंडियन राऊंड) क्रीडा स्पर्धेत मराठा विद्या प्रसारक समाजाच्या नाशिक विभागातील के.टी.एच.एम. महाविद्यालयाच्या धनुर्विद्या अकादमीने उल्लेखनीय यश संपादन केले. सोलापूर येथे झालेल्या या स्पर्धेत महाविद्यालयाच्या खेळाडूंनी दोन रौप्यपदके पटकावत नाशिकचे नाव उज्ज्वल केले.

🔎 हे वाचलं का?:  येत्या 17 ते 20 मार्च दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

या स्पर्धेत कुमार अर्जुन कुमावत यांनी उत्कृष्ट कामगिरी करत एक रौप्यपदक जिंकले, तर कुमारी स्वरा बर्डे हिनेही प्रभावी खेळ करत एक रौप्यपदक मिळवले. आता स्वरा बर्डे हिची आंध्र प्रदेश येथे नॅशनल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या खेळाडूंच्या यशामागे महाविद्यालयातील क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग तसेच धनुर्विद्या विभाग प्रमुख आणि एनआयएस प्रशिक्षक मोहन हिरामण कसबे यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. तसेच संस्थेकडून उपलब्ध करून दिलेले दर्जेदार क्रीडांगण आणि सुविधांमुळे खेळाडूंना उत्तम सरावाची संधी मिळाल्याचे सांगण्यात आले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: महसूल विषयक समस्या तात्काळ सोडविण्यासाठी समाधान शिबिरे प्रभावी- विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

या यशाबद्दल संस्थेचे सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे, अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम बापू मोगल, चिटणीस दिलीप दळवी, अ‍ॅड. संदीप गुळवे, शहर संचालक अ‍ॅड. लक्ष्मण लांडगे, ग्रामीण संचालक रमेशआबा पिंगळे, शिक्षण अधिकारी डॉ. भास्कर ढोके, डॉ. नितीन जाधव, प्रा. शशिकांत मोगल तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कल्पना अहिरे आणि शिक्षकवृंद यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790