नंदिनी मोरे, नाशिक
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेता देशात अत्यावशक सेवा वगळता सलग तिसरे लॉक डाऊन लागू करण्यात आले. गेल्या काही दिवसांपूर्वी यात काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली होती. त्याप्रमाणे एकल दुकानांना परवानगी देण्यात आली होती. दुकानदारांसोबतच ग्राहकांनाही सोशल सोशल डीस्टसिंग पाळायला सांगितले होते. परंतु काही नाशिककरांनी हे गांभीर्याने घेतले नसल्याचे सध्या दिसत आहे.
मे महिन्यातील लॉक डाऊन काही प्रमाणात शिथिल केल्यानंतर अत्यावश्यक सेवा उपभोगण्याचा नावाखाली सोशल डिस्टन्सचे तीन तेरा वाजवले आहे. आर. के, शालिमार परिसरात नागरिकांनी किराणा दुकान, किड्स टॉईज शॉप, कपड्याचे दुकान आणि रोडवर सर्रास पणे गर्दी केली आहे. मात्र ह्या गर्दीत सोशल डीस्टसिंग ची नियमावली धुडकावत लोकं अगदी एकमेकांना खेटून, वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत.
मे महिन्यातील लॉक डाऊन मधे अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त अन्य दुकाने उघडण्यास मुभा दिली असली तरीही, सोशल डीस्टन्स न पाळल्यामुळे संसर्ग वाढून, रुग्णांचा संख्येत झपाट्याने वाढ होऊ शकते, परिणामी सोशल डीस्टन्स न पाळणे नाशिककरांसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. म्हणून नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. आणि प्रशासनाने यासाठी योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे, अन्यथा येणारा काळ हा नाशिक शहरासाठी धोक्याचा ठरेल..