नाशिक (प्रतिनिधी): कर्मयोगीनगर, गोविंदनगर येथील जॉगिंग ट्रॅकचे काम त्वरित सुरू करावे, गतिरोधक बसवावेत, उद्यानांची दुर्दशा थांबवावी, खड्डे बुजवून रस्त्यांचे डांबरीकरण करावे, यासह विविध समस्या सोडविण्यासाठी बुधवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनने रहिवाशांसह रस्त्यावर उतरून निदर्शने केली. अधिकार्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
कर्मयोगीनगर कॉर्नर येथील जॉगिंग ट्रॅक आणि सुशोभिकरणाचे काम त्वरित सुरू करावे, रस्त्यांवर गतिरोधक बसवावेत, नयनतारा इमारतीसमोरील रस्ता दुभाजक काढून भुजबळ फार्मकडे सरळ मार्ग करावा, खड्डे बुजवून रस्त्यांचे डांबरीकरण करावे, उद्यानांची दुर्दशा थांबवावी, रस्ता दुभाजकांचे सुशोभिकरण करावे आदी मागण्यांचे निवेदन शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनने वेळोवेळी महापालिकेला दिले.
ही कामे होत नसल्याने प्रशासनाला जाग येण्यासाठी बुधवारी, २१ डिसेंबर २०२२ रोजी शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख) यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग २४ मधील नागरीक रस्त्यावर उतरले.
आर डी सर्कल, कर्मयोगीनगर कॉर्नर येथील नियोजित जॉगिंग ट्रॅकवर घोषणाबाजी करून निदर्शने करण्यात आली. या सर्व समस्या त्वरित सोडविण्यात येतील, असे आश्वासन महापालिका बांधकाम विभागाचे उपअभियंता हेमंत पठे, शाखा अभियंता जगदिश रत्नपारखी यांनी आंदोलकांना दिले. यानंतर रास्ता रोकोचा निर्णय मागे घेण्यात आला. समस्या न सुटल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, प्रभाकर खैरनार, धवलताई खैरनार, संगिता देशमुख, संध्या छाया ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव देवरे, बापूराव पाटील, विनोद पोळ, निलेश ठाकूर, अशोक गाढवे, भास्कर चौधरी, राजमाता जिजाऊ हास्य क्लबच्या छाया नवले, भारती देशमुख, रंजना सुर्वे, वंदना पाटील, शीतल गवळी, वृषाली ठाकरे, सुरेखा बोंडे, सरीता पाटील, कुमुदिनी फेगडे, संगिता चोपडे, रूही राजहंस, श्रुती पिल्ले, सुनंदा जाधव, विजया फुलदेवरे, कलाबाई कांबळे, विद्या कुलकर्णी, मनिषा चंद्रात्रे, शालिनी कुलकर्णी, लता नवले, मंगला पांगरे, उषा धोंगडे, प्रेमा गवळी, विद्या देशमुख, यशोदा अमृतकर, सुनेत्रा लहाने, प्रमिला पाटील, सुप्रिया गोरे, शशी नरोडे, लताताई सावळे, कमलबाई कांबळे, कल्पना सोनजे, करुणा शेलार, कल्पना अमृतकर, सरीता विभांडिक, जयश्री पडोळ, दिपाली परदेशी, संगिता सोनी, योगिनी चंद्रात्रे, भारती नंदन, प्रथमेश पाटील, हरिष काळे, संकेत गायकवाड (देशमुख) यांच्यासह राजमाता जिजाऊ महिला हास्य क्लबच्या सदस्या यावेळी हजर होत्या.