नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): सातपूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे तत्कालीन प्रभारी प्राचार्य संशयित सुभाष मारुती कदम, तत्कालीन यांनी शासन निधीचा गैर वापर करून तसेच खोटे बिले सादर करून शासन १९ लाख ५० हजार ६८२ रुपयाचा अपहार केल्याचे लाच लुचतप प्रतिबंध विभागाच्या चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्याविरुध्द म्हणुन सातपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक वैशाली पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसारऔद्योगिक प्रशिक्षण संस्था, सातपूर नाशिक येथे सन २०१७-२०१८ मध्ये आलोसे सुभाष मारुती कदम, तत्कालीन प्रभारी प्राचार्य असताना जेम्स पोर्टलवरुन खरेदी प्रक्रिया मध्ये अनियमितता दाखवून व तंत्र प्रदर्शन स्पर्धा नियमाप्रमाणे न भरविता मोठ्या प्रमाणात शासन निधीचा गैर वापर करून तसेच खोटे बिले सादर करून शासन रक्कम एकोणीस लाख पन्नास हजार सहाशे ब्यांएशी रुपये अपहार करून शासनाचे नुकसान केल्याचे उघड चौकशीत निष्पन्न झाले.
त्यानंतर सुभाष मारुती कदम, यांचेविरुध्द सातपूर पोलीस स्टेशन नाशिक शहर येथे १२ जून रोजी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम १३(१) (अ) व भादवी कलम ४२०,४६५,४६७,४६८,४७१, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (गुन्हा रजिस्टर नंबर १५२/२०२४ )