नाशिक (प्रतिनिधी): नाशिक रोडचे पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणारे पोलीस उपनिरीक्षक गणपत महादू काकड यांना 15000 रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे.
त्यामुळे नाशिक रोड पोलीस स्टेशन वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
नाशिक रोड पोलीस स्टेशन मध्ये दाखल असलेल्या 354 च्या गुन्ह्यात तक्रारदाराला मदत करणार या आश्वासनावर 25 हजाराची लाच काकड यांनी मागितली होती. या संदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली.
25 हजाराहून हे डील 15 हजारावर ठरवण्यात आले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नासिक रोड पोलीस स्टेशनच्या मागील बाजूस गणपत काकड यांना पंचांसमक्ष पंधरा हजार रुपये स्वीकारताना रंगे हात पकडले.
यासंदर्भात गणपत काकड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करीत आहे.दरम्यान गणपत काकड हे नाशिक रोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास वांजळे यांचे अतिशय निकटवर्तीय सहकारी मानले जात होते.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईमुळे नाशिक रोड पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. शिवाय नाशिक रोड पोलीस छुप्या पद्धतीने चालणाऱ्या अवैध धंद्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहे.