बसेसची विशेष तपासणी; ‘आरटीओ’ला उशिरा जाग, समृद्धीच्या‎ घटनेनंतर खासगी बसची तपासणी‎ मोहिम

नाशिक (प्रतिनिधी): समृद्धी महामार्गावर खासगी ट्रॅव्हल बसला‎ झालेल्या अपघातानंतर नाशिक‎ आरटीओला उशिरा जाग आली असून‎ उशिरा का होईना खासगी बसची तपासणी‎ सुरू करत प्रवाशांच्या सुरक्षेकरिता‎ आरटीओ रस्त्यावर दिसून येत आहे.‎ खासगी बसेसच्या वाढत्या अपघातांच्या‎ पार्श्वभूमीवर बसेसची विशेष तपासणी‎ मोहीम सुरू करण्यात आली आहे.‎

जिल्ह्यातील स्लीपर बसचालक व मालक‎ यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय नाशिक‎ येथे आपल्या बसेस पुनर्तपासणी करून‎ प्रमाणित करून घ्याव्यात, असे आवाहन‎ प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे‎ यांनी केले आहे.‎ स्लीपर बसचे अपघात रोखणे व‎ आपत्कालीनप्रसंगी जीवितहानी‎ टाळण्यासाठी उपाययोजना व सूचना जारी‎ करण्यात आल्या आहेत. आरटीओकडून‎ खासगी बस वाहतूकदारांसाठी उपाययोजना‎ करण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: सोन्याचं मंगळसूत्र केलं परत; महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा !

बसचा‎ आपत्कालीन दरवाजा सुस्थितीत असणे‎ आवश्यक आहे. त्यासमोर व मागे‎ कोणत्याही प्रकारचा अडथळा असू नये.‎ आपत्कालीन दरवाजाच्या दर्शनी भागात‎ हॅमर उपलब्ध होणे आवश्यक आहे.‎ आपत्कालीनप्रसंगी बाहेर पडण्याचे मार्ग‎ तसेच बसमधील अन्य बचावात्मक‎ उपकरणांसबंधीची माहिती प्रवाशांना प्रवास‎ सुरू होण्यापूर्वी देणे आवश्यक आहे.‎

याबाबतची चित्रफीत बसमध्ये प्रसारित‎ करण्यात यावी, अथवा इ-मेल व सोशल‎ मीडियाद्वारे बसमधील प्रवाशांना चित्रफीत‎ प्रसारित करण्यात यावी. वाहन चालक हा‎ मद्यप्राशन अथवा अंमली पदार्थांचे सेवन‎ करून वाहन चालविणार नाही याची‎ खातरजमा करूनच वाहनमालकांनी‎ वाहनचालकास वाहन चालविण्यास देणे‎ आवश्यक आहे. यासंदर्भातील सर्वस्वी‎ जबाबदारी वाहनमालकाची असेल यांची‎ नोंद घ्यावी.

हे ही वाचा:  नाशिक: सोन्याचं मंगळसूत्र केलं परत; महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा !

वाहनचालक वाहन‎ चालविताना मोबाइलचा वापर करणार‎ नाहीत याचीही वाहन मालकांनी खबरदारी‎ घेणे आवश्यक आहे. वेळोवेळी‎ वाहनचालकांनी नेत्र व आरोग्य तपासणी‎ करून घ्यावी. दर दाेन तासांनी विश्रांती‎ घेण्याबाबत वाहन चालकांना सूचना देण्यात‎ येत आहे. वाहन चालविताना वेग मर्यादेचे‎ उल्लंघन होणार नाही यादृष्टीने वाहनांना‎ योग्य ते गती नियंत्रक बसविणे, वाहनात‎ बसविण्यात आलेले स्पीड गर्व्हनर उपकरण‎ सुस्थितीत व कार्यान्वित ठेवणे व वेळोवेळी‎ त्याचे कॅलिब्रेशन करून घेणे याची‎ जबाबदारी वाहनमालकांची आहे.‎

हे ही वाचा:  नाशिक: सोन्याचं मंगळसूत्र केलं परत; महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा !

बसमधील अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत‎ असावी. बसमध्ये क्षमतेपेक्षा अतिरिक्त‎ प्रवाशांची वाहतूक करू नये. वाहन‎ चालविताना वाहनचालकांनी लेनची शिस्त‎ पाळणे व दोन वाहनांमध्ये सुरक्षित अंतर‎ ठेवणे याबाबत वाहनचालकांना निर्देश‎ देण्यात यावेत. वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र‎ विहित मुदतीतमध्ये नूतनीकरण करून घ्यावे‎ तसेच वाहन निरंतरपणे सुस्थितीत राहील‎ याची वाहनचालकांनी व वाहनमालकांनी‎ दक्षात घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक‎ परिवहन अधिकारी शिंदे यांनी केले आहे.‎

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790