नाशिक शहरातील ‘प्रायव्हसी’ पुरविणाऱ्या या ८ कॉफी शॉप्सवर धडक कारवाई !

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): इंदिरानगरनंतर आता नाशिक शहर पोलिसांनी ‘प्रायव्हसी’ पुरवणाऱ्या कॉफी शॉप्सवर धडक कारवाई सुरु केली आहे. नाशिक शहर पोलिसांनी आज (दि. १८ ऑक्टोबर) सायंकाळी याबाबत प्रेस नोट जारी केली आहे.

नाशिक शहरातील कॉफी शॉपमध्ये अनाधिकृतपणे कंपार्टमेंट / पार्टीशन तयार करून तरूण तरूणींना बेकायदेशिरपणे प्रायव्हसी पुरवून सदर ठिकाणी अंमली पदार्थाचे सेवन व अश्लिल कृत्यांना आसरा दिला जात असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या.

याअनुषंगाने गंगापुर पोलीस ठाणे हद्दीत पाहणी केली असता ०८ कॅफेमध्ये अनाधिकृतपणे अंतर्गत व बाह्य रचनेत अतिक्रमण करून बदल केला असल्याचे निदर्शनास आले.

हे ही वाचा:  नाशिक: थंडीचा कडाका वाढला; पारा १२.४ अंशांपर्यंत घसरला

सदर अंतर्गत रचनेमुळे अंमली पदार्थ सेवन तसेच महिलांविरोधी गुन्हे घडण्यास पोषक स्थिती निर्माण करण्यात आली होती. या कॅफे शॉपवर कारवाई करण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे महानगरपालिकेस विनंती करण्यात आली होती.

त्यानुसार कारवाईसाठी पोलीस विभाग व महानगरपालिका यांची संयुक्त पथके निर्माण करून अनाधिकृतपणे कंपार्टमेंट / पार्टीशन तयार करून तरूण तरूणींना बेकायदेशिरपणे प्रायव्हसी पुरविणाऱ्या एकुण ०८ कॉफी शॉप मधील अनाधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. तसेच सदरच्या आस्थापना महानगरपालिकेकडून सिल करण्यात आलेल्या आहेत.

कारवाई करण्यात आलेल्या आस्थापना पुढील प्रमाणे:
१) सिझर कॅफे, हॉलमार्क चौक, कॉलेजरोड, नाशिक २) यारी कट्टा, सुयोजित कॉम्पलेक्स, नाशिक ३) कॅफे क्लासिक डे लाईट, सुयोजित कॉम्पलेक्स, नाशिक ४) हॅरीज किचन कॅफे, सुयोजित कॉम्पलेक्स, नाशिक ५) पॉकेट कॅफे, श्रध्दा मॉल, कॉलेजरोड, नाशिक ६) वल्लाज कॅफे टेरीया, श्रध्दा मॉल, कॉलेजरोड, नाशिक ७) मुरली कॅफे, रामराज्य सोसायटी, महात्मा नगर, नाशिक ८) मॅझिक वर्ल्ड कॅफे, पी. एम. पी. एस. कॉलेज जवळ, डी के नगर नाशिक.

हे ही वाचा:  बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी तर दहावीची २१ फेब्रुवारीपासून

सदरची कारवाई अंकुश शिंदे (पोलीस आयुक्त, नाशिक शहर) व डॉ. अशोक करंजकर (आयुक्त तथा प्रशासक, म. न. पा. नाशिक) यांच्या मार्गदर्शनाखाली किरणकुमार चव्हाण (पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – १, नाशिक शहर), डॉ. सिध्देश्वर धुमाळ (सहा. पोलीस आयुक्त, सरकारवाडा विभाग, नाशिक शहर), श्रीकांत निंबाळकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गंगापुर पोलीस ठाणे), दिलीप ठाकुर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरकारवाडा पोलीस ठाणे) व पथक तसेच श्रीकांत पवार (उपायुक्त, म. न. पा. नाशिक), संजय अग्रवाल (अधिक्षक अभियंता), हर्षल बाविस्कर (उप संचालक, टाउन प्लॅनींग), हरिष चंद्रे, राजाराम जाधव, योगेश रकटे, विभागीय अधिकारी, म. न. पा. नाशिक व पथक यांनी केलेली असुन नाशिक शहरात यापुढे अशाच प्रकारच्या धडक कारवाया करण्यात येणार आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790