मालेगाव येथे तैनात असलेले नाशिकचे 16 पोलीस पॉझिटिव्ह

नाशिक(प्रतिनिधी): आज (दि.13 मे 2020) सकाळी प्राप्त झालेले अहवाल हे नाशिक शहराची चिन्ता वाढवणारे आहेत. पोलीस दिवस रात्र जीव धोक्यात घालून काम करत आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने उपाययोजना करणे गरजेचे आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये मालेगाव येथे तैनात असलेले नाशिकचे 16 पोलीस कोरोनाबाधित झाले आहेत. हे सर्व पोलीस नाशिक येथील रहिवासी आहेत. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे:

हे ही वाचा:  नाशिक: आईचंच काळीज ते! लेकराचा मृत्यू झाल्याचं कळलं, आईनेही प्राण सोडला

पोलीस हेडक्वार्टर आडगाव- 2, जेल रोड-1, तांबे मळा- 1, जेल रोड- 1, अशोक मार्ग- 1, रासबिहारी स्कूल- 1, कामटवाडा-2, पंचवटी- 1, धात्रक फाटा-  1, लोखंडे मळा- 1, पाथर्डी फाटा- 1, घोटी टोल नाका- 1, हनुमान नगर- 1, पोलीस हेडक्वार्टर- 1. (या सर्वांचे सविस्तर रहिवासी पत्ते अजून प्रशासनाकडून प्राप्त झालेले नाहीत. प्राप्त झाल्यावर ताबडतोब प्रसिद्ध करण्यात येतील.)

हे ही वाचा:  नाशिक: भरधाव कार पलटी होऊन दोघांचा मृत्यू; समृध्दी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच

याव्यतिरिक्त अमरावतीचे 2 एसआरपीएफ जवानांचे अहवालही पॉझिटिव्ह आले आहेत.

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790