नाशिक: पंचवटीतील युवक खूनप्रकरणी चौघा संशयितांना अवघ्या काही तासांत अटक !

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): काहीतरी कारणावरून वडिलांशी वाद घातला या कारणावरून कुरापत काढत मखमलाबाद रोडवरील जगझाप मार्ग गुंजाळ मळा परिसरात एका २६ वर्षीय युवकाचा सहा जणांनी डोक्यावर मानेवर धारदार चॉपरने वार करत खून केल्याची घटना शुक्रवारी दुपारी (दि.१३) भरदिवसा घडली. मारेकऱ्यांनी केलेल्या हल्ल्यात क्रांतीनगर परिसरात राहणाऱ्या सागर विष्णू शिंदे याचा वर्मी घाव लागल्याने घटनास्थळी मृत्यू झाला.

या घटनेनंतर फरार झालेल्या संशयितांपैकी चौघा जणांना पंचवटी पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने कसबे सुकेणे येथून ताब्यात घेत अटक केली आहे. मखमलाबाद रोडवर भरदिवसा घडलेल्या खुनाच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: भरधाव मोटारसायकलच्या धडकेत २४ वर्षीय युवतीचा मृत्यू

या घटनेबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, मखमलाबाद रोडवर क्रांती नगर परिसरात राहणारा सागर विष्णू शिंदे याचे परिसरात राहणाऱ्या केदार साहेबराव इंगळे याच्या वडिलांशी काहीतरी कारणावरून वाद झाले होते. त्यावेळी सागर याने इंगळे याच्या वडिलांना शिवीगाळ केली होती.

शुक्रवारी दुपारी सागर शिंदे प्रणव डिस्ट्रिब्युटर्स ओट्याजवळ मित्र योगेश वाघ, अशोक वाघ यांच्या समावेत गप्पा मारत बसलेला असताना त्या ठिकाणी चारचाकी व दुचाकीवरून केदार साहेबराव इंगळे, ऋषिकेश रामचंद्र आहेर, दीपक सुखदेव डगळे आणि नकुल सुरेश चव्हाण व इतर दोघे असे सहाजण आले. त्यावेळी संशयित इंगळे व इतर संशयितांनी सागरशी वाद घालत धारदार चॉपरने त्याच्यावर सपासप वार केले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: एटीएममध्ये कार्ड लॉक झाल्याचा गैरफायदा घेऊन कार्ड काढून १ लाखांची फसवणूक

घटनेचे वृत्त कळताच पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्यासह गुन्हा शोध पथकाचे पोलिस कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. या घटनेनंतर पंचवटी पोलिस ठाण्याच्या गुन्हा शोध पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कसबे सुकेणे गाठून इंगळे, आहेर, डगळे व चव्हाण या चौघांना अवघ्या काही तासात बेड्या ठोकल्या आहेत.

⚡ हे ही वाचा:  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाने दिली ‘ही’ शेवटची तारीख !

या घटनेतील इतर दोन संशयित फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. घटनेबाबत आकाश मोतीराम गुंजाळ याने दिलेल्या तक्रारीवरून पंचवटी पोलिस ठाण्यात संशयित केदार इंगळे याच्यासह पाच जणांवर गैरकायदा मंडळी जमविणे, खून, खुनाचा कट रचणे आणि बेकायदा शस्त्र बाळगणे आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here