नाशिक। दि. १३ जानेवारी २०२६: आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर रामकुंड परिसरातील पायाभूत सुविधांचे काम हाती घेण्यात आले आहे.
नाशिक स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत रामकुंड ते गाडगे महाराज पुलापर्यंत विविध ठिकाणी रस्ते खोदून बॉक्स नाल्याचे बांधकाम टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. हे काम सुमारे सहा महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
या कामामुळे रामकुंड परिसरातील काही प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक पूर्णतः बंद ठेवून ती पर्यायी मार्गाने वळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मालेगाव स्टँड–रामकुंड ते म्हसोबा पटांगण, ढिकले वाचनालय–रामकुंड ते म्हसोबा पटांगण, सरदार चौकातून रामकुंडकडे जाणारा रस्ता तसेच खांदवे सभागृह ते रामकुंड या मार्गांवरील दोन्ही बाजूंची ये-जा कामकाज पूर्ण होईपर्यंत बंद राहणार आहे.
🚫 प्रवेश बंद असलेले मार्ग:
👉 मालेगाव स्टँड ते रामकुंड–म्हसोबा पटांगण मार्ग
👉 ढिकले वाचनालय ते रामकुंड–म्हसोबा पटांगण मार्ग
👉 खांदवे सभागृह ते रामकुंड मार्ग
👉 सरदार चौक ते रामकुंड मार्ग
या सर्व रस्त्यांवर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.
⤴️ पर्यायी वाहतूक मार्ग:
या परिसरातून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांनी मालेगाव स्टँड – पंचवटी कारंजा – दिंडोरी नाका – काट्या मारुती – गणेशवाडी – गौरी पटांगण या मार्गाचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
🅿️ पार्किंग व्यवस्था:
भाविकांसाठी गौरी पटांगण येथे वाहनतळाची सोय करण्यात आली आहे. येथे वाहने पार्क करून कपालेश्वर व रामकुंड येथे दर्शन व धार्मिक विधींसाठी भाविकांनी पायी जावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
🚧 बॅरिकेडिंग पॉइंट्स:
मालेगाव स्टँड, ढिकले वाचनालय, खांदवे सभागृह आणि तांबोळी पान भंडार परिसरात बॅरिकेडिंग करण्यात येणार आहे. वाहतूक पोलिस व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
![]()


