पंचवटी येथील 36 वर्षीय रूग्णाचे कोरोना संसर्गाने मृत्यू; कोरोनाचा पाचवा बळी

नाशिक (प्रतिनिधी): शहरातील पेठरोड पंचवटी (नाशिक ) येथील 36 वर्षीय कोरोना संसर्गित पुरुष रूग्णाचे सोमवारी (25 मे 2020) रोजी जिल्हा रुग्णालय, नाशिक येथे मृत्यू झाला असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. नाशिकमधील कोरोनाचा हा पाचवा बळी आहे.त्याचप्रमाणे आज सकाळी राणा प्रताप चौकात अजून दोन रुग्ण आढळले आहेत.

या संदर्भात माहिती देताना अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कळवले आहे की, पेठरोड पंचवटी, नाशिक येथील 36 वर्षीय पुरुष 22 मे 2020 रोजी जिल्हा रुग्णालय नाशिक येथे दाखल झाले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शहरातील या महत्वाच्या वाहतूक मार्गात आज (दि. ११) बदल

त्यापूर्वी काही दिवस त्यांना ताप, घशात दुखणे व श्वसनाचा त्रास होत असल्याने ते 21 मे 2020 रोजी झाकीर हुसेन रुग्णालयात तपासणीसाठी गेले. त्यांना पूर्वीपासूनच मधुमेहाचा विकार होता व रक्तातील साखरेचे प्रमाण 600 पेक्षा जास्त असल्याचे तपासात आढळून आले, तसेच रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण (spo) कमी होत असल्याचे दिसून आले. म्हणून त्यांचे घशाचे नमुना तपासणीसाठी घेऊन त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय, नाशिक येथे संदर्भीत करण्यात आले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अधिकाऱ्यांनी सदाचार, संवेदनशीलता आणि समर्पण वृत्तीचा स्वीकार करावा- पोलिस महासंचालक सदानंद दाते

जिल्हा रूग्णालयात त्यांच्या छातीच्या एक्स-रे मध्ये न्यूमोनियाची लक्षणे आढळून आली. त्यानुसार त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांना मार्फत योग्य ते उपचार सुरू होते. 22 मे 2020 रोजी सायंकाळी त्यांच्या घशाचा नमुना अहवाल कोरोना बाधित असा आला. त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने पूर्णवेळ ऑक्सिजन पुरवठा सुरू होता. तसेच त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाणही नियंत्रणात येत नव्हते. 24 मे 2020 रोजी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना कोविड अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. तज्ञ डॉक्टरांच्या टीमने पूर्ण प्रयत्न करूनही आज 25 मे 2020 रोजी सकाळी त्यांचा मृत्यू झाला, असे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कळवले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790