नाशिक: जुन्या मध्यवर्ती बसस्थानकाचे आता रूपडे पालटणार

नाशिक (प्रतिनिधी): गेल्या अनेक वर्षांपासून नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या जुन्या मध्यवर्ती बसस्थानकाचे रुपडे पालटणार आहे. मेळा बसस्थानका पाठोपाठ नाशिककरांना अजून एक सुसज्ज असे बसस्थानक मिळणार आहे. शतकपूर्तीच्या उंबरठ्यावर पोहोचलेली स्थानकाची इमारत कालौघात जीर्ण झाली होती. ती आता जमीनदोस्त करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  राष्ट्रीय मतदार दिवस: राज्यस्तरीय कार्यक्रमानिमित्त नाशिकला आज (दि. २५) विविध कार्यक्रम

जुन्या सीबीएसला पुढील वर्षी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. तत्कालीन मुंबईचे मुख्यमंत्री स्व. मोरारजी देसाई यांच्या हस्ते या बसस्थानकाचे उद्घाटन करण्यात आले होते. अनेक वर्षांपासून डागडुजी, रंगरंगोटी करून वास्तू टिकवली जात होती. अखेर शासनाकडून वास्तूच्या पुनर्निर्माणासाठी दहा कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून, जुनी इमारत पाडण्यात येत आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: आज भारतीय सेनेच्या आधुनिक शस्त्रसामग्रीसह आपत्ती प्रतिसाद दल उपकरणांचे प्रदर्शन

त्या ठिकाणी आता नव्याने दोन मजली इमारत उभी राहणार असून, तळमजल्यावर ९५० चौरस मीटरचे, तर पहिल्या मजल्यावर ५९० चौरस मीटरचे आहे. काम केले जाणार सीबीएस परिसरातील ४४०० चौरस मीटर क्षेत्राचे काँक्रिटीकरण करण्यात येणार असून, पेव्हर ब्लॉकदेखील लावण्यात येणार आहेत. सोबतच, अद्ययावत अग्निरोधक यंत्रणा आणि तसेच रेनवॉटर हार्वेस्टिंग यासारख्या सुविधादेखील उपलब्ध असतील. परिसरातील दुकाने इतरत्र हलविण्यात आली असून बसस्थानकाचा संपूर्ण परिसर पत्र्याने झाकण्यात आला आहे. लवकरच प्रवाशांना नव्या रुपातील बसस्थानक मिळेल.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790