नाशिक (विशेष प्रतिनिधी): गंगापूर रोड परिसरातून कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर तो परिसर पूर्णपणे प्रतिबंधित करण्यात आला. त्यामुळे आता कुठल्याच रहिवाशाला घराबाहेर पडण्यास मनाई आहे. अशात या लोकांच्या गरजा कशा पूर्ण होणार हा प्रश्न होता. मात्र यांत्रानेनी हा प्रश्न सफाईदारपणे सोडविला आहे. पोलिसांच्या या उपाययोजनेचं कौतुकच करायला हवं ! आपापल्या सोसायटीमधील लोकांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी एका त्यांच्यातल्या एका व्यक्तीची नियुक्ती करण्यात येईल. त्यानंतर ती व्यक्ति सोसायटीतल्या सगळ्यांच्या गरजांच्या वस्तूंची माहिती घेऊन ती महापालिकेला सांगेल.
त्यानंतर नाशिक महापालीकेनी नियुक्त केलेल्या पुरवठादारांकडून सर्व वस्तूंचा पुरवठा नागरिकांना करण्यात येईल. या भागातील रहिवाशी नितीन व्यास यांनी नाशिक कॉलिंगशी बोलतांना दिली. आणि ही माहिती देतानाच त्यांनी सर्व प्रशासनाचे आभार आणि कौतुकही केलं.