नाशिक (प्रतिनिधी): शहरातून एक दुर्दैवी बातमी समोर येत आहे. आर्टिलरी सेंटरमध्ये स्फोट झाल्याने दोन अग्निवीरांचा मृत्यू झाला आहे. सरावावेळी फायरिंग करत असताना स्फोट झाल्याने अग्निवीरांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये अग्निवीरांना प्रशिक्षण दिले जाते. काल (दि. १०) दुपारी आर्टिलरी सेंटरमध्ये अग्निवीरांचा सराव सुरु होता.
गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अग्निवीरांची एक तुकडी शिंगवे बहुला येथे फायरिंग रेंज या ठिकाणी तोफेचा सराव करण्यासाठी गेली. चमूने बॅाम्बगोळा फायर करत असतांना शेलचा ब्लास्ट झाला. त्यात दोघांचा मृत्यू झाला. गोहिल विश्वराज सिंग (२०), सैफत शीत (२१) असे या अग्निवीरांचे नाव आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (ए.डी. रजिस्टर क्रमांक: ८०/२०२४)