नाशिक। दि. १० जानेवारी २०२५: संत श्री निवृत्तीनाथ महाराज याग उत्सव दिनांक १३ जानेवारी २०२६ ते १५ जानेवारी २०२६ या कालावधीत संपन्न होणार असून यात्रेचा मुख्य दिवस बुधवारी (दि. १४) आहे. या कालावधीत राज्यभरातून येणाऱ्या भाविकांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत विशेष वाहतूक नियोजन केले आहे. या यात्रेसाठी एकूण २३० जादा बसेसचे नियोजन करण्यात आले असून नाशिक जिल्ह्यातील विविध बसस्थानकांवरून त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे दर १५ मिनिटांनी या मार्गावर बस उपलब्ध असेल.
या यात्रेसाठी नाशिक ते त्र्यंबकेश्वर हा मार्ग २८.३ किलोमीटर अंतराचा असून प्रौढ प्रवाशांसाठी ५१ रुपये व मुलांसाठी २६ रुपये भाडे आकारण्यात येणार आहे. सिन्नर-नाशिक-त्र्यंबकेश्वर या मार्गावर ५९.३ किलोमीटर अंतर असून प्रौढांसाठी १०२ रुपये व मुलांसाठी ५१ रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे. इगतपुरी-त्र्यंबकेश्वर-नाशिक या ७३.५ किलोमीटर अंतराच्या मार्गावर प्रौढ भाडे १३२ रुपये तर मुलांचे भाडे ६६ रुपये असेल.
इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मार्गे देवगाव या ७४.५ किलोमीटर अंतराच्या मार्गावरही प्रौढांसाठी १३२ रुपये व मुलांसाठी ६६ रुपये भाडे आकारण्यात येणार आहे. घोटी-त्र्यंबकेश्वर मार्गे नाशिक हा मार्ग ६१ किलोमीटर अंतराचा असून प्रौढ भाडे १२२ रुपये व मुलांचे भाडे ६१ रुपये राहील. पिंपळगाव-त्र्यंबकेश्वर मार्गे नाशिक या ६०.३ किलोमीटर अंतराच्या मार्गावरही प्रौढांसाठी १२२ रुपये व मुलांसाठी ६१ रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे. सातपूर-त्र्यंबकेश्वर या २२.९ किलोमीटर अंतराच्या मार्गावर प्रौढांसाठी ४१ रुपये व मुलांसाठी २१ रुपये भाडे राहील.
![]()


