नाशिक: ‘या’ भागांतील वीजपुरवठा शनिवारी (दि. १२) बंद राहणार

नाशिक। दि. ११ सप्टेंबर २०२६: नाशिक रोडवरील मुक्तीधाम विद्युत उपकेंद्रामधून निघणाऱ्या लॅमरोड या ११केव्ही वीज वाहिनीच्या तातडीच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामाकरीता शनिवारी दिनांक १२ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत वीज पुरवठा टप्याटप्याने बंद राहणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: दत्तक प्रक्रियेला नवी दिशा; ८ बालकांना मिळाले हक्काचे कुटुंब

सदर विद्युत वाहिनी बंद असल्याने खालील परिसरातील वीज पुरवठा टप्प्याटप्प्याने प्रभावित राहील.
यामध्ये: राजवाडा ,जयाउद्दीन डेपो ,सुभाष रोड, मालधक्का रोड ,गुलाबवाडी, गौतम छात्रालय, पाटील गॅरेज सिद्धार्थ नगर , पवार वाडी, विहितगाव, बागुल नगर देवळाली गाव, साठे नगर, गांधी पुतळा, सौभाग्य नगर आणि परिसर याचा समावेश आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: एसटी बस नियोजनात उद्यापासून (दि. ११) महत्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर...

देखभाल व दुरुस्तीचे काम नियोजित वेळेअगोदर पूर्ण झाल्यास किंवा तांत्रिक कारणास्तव वेळ लागल्यास त्यानुसार वीज पुरवठा सुरू करण्यात येईल. तरी संबंधित ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या नाशिक शहर विभाग २ कडून करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790