नाशिक महानगरपालिका निवडणूक: मतदानाला जातांना ही महत्वाची माहिती जाणून घ्या…

नाशिक। दि. १५ जानेवारी २०२६: गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या नाशिकसह मुंबई, पुणे, जळगाव, सोलापूर आदी राज्यातील एकूण २९ महानगरपालिकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. उद्या (दि. १६) मतमोजणी होणार असून, दुपारी चार वाजेपर्यंत बहुतांश निकालांचा कल स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

नाशिक महापालिकेच्या ४३ वर्षांच्या इतिहासात दुसऱ्यांदा प्रभागनिहाय मतदान होत आहे. शहरातील ३१ प्रभागांत एकूण १२२ जागांसाठी ही निवडणूक होत असून, यावेळी राजकीय लढत विशेष लक्षवेधी ठरली आहे. पहिल्यांदाच शिवसेनेचे (शिंदे गट व उद्धव गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट व शरद पवार गट) दोन-दोन गट परस्परांसमोर उभे ठाकले आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पार्टटाइम जॉबच्या नावाखाली ३६ लाखांची ऑनलाइन फसवणूक

नाशिकमध्ये भाजप व शिवसेना (शिंदे गट) यांची युती झालेली नसल्याने तिरंगी-चौरंगी लढतींचे चित्र आहे. भाजपने सर्वाधिक ११८ जागांवर उमेदवार दिले असून, शिवसेना (शिंदे गट) १०२ तर शिवसेना (उद्धव ठाकरे गट) ७९ जागांवर निवडणूक लढवत आहे. नाशिक महापालिकेसाठी एकूण १३ लाख ६० हजार ७२२ मतदार नोंदणीकृत आहेत.

राज्यपातळीवर २९ महानगरपालिकांसाठी एकूण ३ कोटी ४८ लाख ७८ हजार १७ मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत. विशेष म्हणजे, राज्यात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर महापालिकांच्या निवडणुका एकाच टप्प्यात घेतल्या जात आहेत. या निकालांचा प्रभाव आगामी राजकीय समीकरणांवर महत्त्वाचा ठरणार आहे, कारण पुढील तीन वर्षांत राज्यात कोणतीही मोठी निवडणूक अपेक्षित नाही.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: तपोवन वृक्षतोडप्रकरणी उच्च न्यायालयात आज सुनावणी

मतदानासाठी उपयुक्त माहिती:
👉
मतदार यादीत नाव आहे का?
संबंधित मतदान केंद्रावर चौकशी करता येईल किंवा https://www.nvsp.in या संकेतस्थळावर ईपीआयसी क्रमांक टाकून माहिती मिळवता येईल
👉 मतदार ओळखपत्र नसल्यास कोणते पर्याय चालतील?
आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो असलेले बँक पासबुक किंवा ड्रायव्हिंग लायसन्स वैध आहेत.
👉 नावाच्या स्पेलिंगमध्ये त्रुटी किंवा फोटो जुळत नसेल तर?
ओळखपत्रावरील नाव व फोटो समाधानकारकरीत्या जुळल्यास आणि बूथ एजंटची खात्री झाल्यास मतदान करता येईल.
👉 आपले पोलिंग बूथ कसे शोधावे?
निवडणूक हेल्पलाईन क्रमांक १९५० वर संपर्क साधून संपूर्ण पत्ता द्यावा.

🔎 हे वाचलं का?:  महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ‘एनसीएफ’तर्फे नाशिककरांचा अपेक्षानामा सादर

प्रत्येक मतदाराला चारही गटांत मतदान करावेच लागेल. ज्या गटात मत द्यायचे नसेल त्या गटातील ‘नोटा’चे बटण दाबावे लागेल. ४ वेळा मत नोंदवल्याशिवाय मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार नाही.

👉 ईव्हीएमवरील रंग संकेत
गट ‘अ’ :
पांढरी पट्टी
गट ‘ब’ : गुलाबी पट्टी
गट ‘क’ : पिवळी पट्टी
गट ‘ड’ : निळी पट्टी

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790