नाशिक: पुढील तीन दिवस महापालिकेचे करसंकलन केंद्र राहणार सुरू

नाशिक: आर्थिक वर्ष संपण्यासाठी चार महिने बाकी असल्यामुळे महापालिकेने सुट्टीच्या दिवशी करसंकलन केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असून त्याचाच भाग एक म्हणून शुक्रवार (दि. ६), शनिवार (दि. ७) आणि रविवार (दि. ८) या सुट्टीच्या दिवशी करसंकलन केंद्र सुरू राहणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रजासत्ताक दिनानिमित्त उद्या (दि. २६) विविध कार्यक्रमांचे आयोजन

पालिकेने आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला कर सवलत योजना लागू केल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये करवसुली झाली. त्यानंतर आता अभय योजनेंतर्गत थकबाकीची रक्कम भरून घेण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये अडचण येऊ नये म्हणून ३० नोव्हेंबर ते ३१ मार्च या कालावधीमध्ये शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सर्व विभागांतील भरणा केंद्र, नागरी सुविधा केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याची जबाबदारी विभागाचे प्रमुख म्हणून संबंधित विभागीय अधिकाऱ्याची राहणार असल्याचे आयुक्तांच्या आदेशात म्हटले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790