LPG

नाशिक जिल्ह्यातील गॅस सिलिंडरच्या उपलब्धतेबाबत महत्वाची अपडेट…

नाशिक। दि. १३ मार्च २०२६: नाशिक जिल्ह्यात घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवा पसरवू नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  देवळाली रिंग रोडसाठी भूसंपादन; शेतकऱ्यांना योग्य मोबदल्याबाबत शासनाचा सहानुभूतीपूर्वक विचार- मंत्री शिवेंद्रसिंह भोसले

आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिका–इराण युद्धाबाबत सुरू असलेल्या चर्चांमुळे काही ठिकाणी स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या टंचाईबाबत अफवा आहेत. मात्र, नाशिक जिल्ह्यात सध्या स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत असून कोणतीही टंचाई नाही.

गॅस पुरवठा कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत संपर्कात आहोत. जिल्ह्यातील गॅस वितरण व साठा याबाबत आढावा घेतला आहे. नागरिकांना नियमित आणि अखंडित गॅस पुरवठा सुनिश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्याआहेत. तसेच गॅस सिलिंडरचा साठा करून कृत्रिम टंचाई निर्माण करणे किंवा काळाबाजार करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

🔎 हे वाचलं का?:  मार्चच्या अवघ्या १२ दिवसांतच नाशिकचा पारा ३८ अंशांपार; दशकातील पहिली नोंद

नागरिकांनी कोणत्याही अफवा पसरवू नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच घाबरून अनावश्यक गॅस सिलिंडर साठवू नयेत, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790