नाशिक। दि. १८ डिसेंबर २०२५: नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर प्राधिकरणाने आज नाशिक जिल्हा व शेजारील जिल्ह्यांमधील टेलीकॉम, फायबर, मोबाईल टॉवर यांच्याबाबतीत टेलीकॉम सेवा पुरवठादार यांच्या समवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यात टेलीकॉम सेवा पुरवठादार यांनी पायाभूत सुविधा निर्माण करताना ज्या शासकीय यंत्रणांचा सहभाग आहे, त्याठिकाणी पायाभूत सुविधा, जसे, रस्ते, नाले, रस्ता विस्तारीकरण यासारख्या सुविधांमध्ये ऑप्टिकल फायबर आच्छादन्यासाठी सुविधा देण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली. प्राधिकरणाने त्यानुषंगाने संबंधीत विभागांकडील अद्यावत अशा डिजीटल नकाशांची पुर्तता प्रशासनाकडून, टेलीकॉम सेवा पुरवठादारांना दिली जाईल असे आश्वासीत करताना, साधूग्राम, घाट परीसर, पार्कींग, रिंगरोड, नाशिक मनपा, सार्वजनीक बांधकाम, शासकीय मुख्य इमारती यांची माहिती देखील टेलीकॉम सेवा पुरवठादारांना दिली जाईल, व एकाच पातळीवर त्याबाबत पुढील कारवाई बाबत पर्यवेक्षण अनुषंगाने प्राधिकरण आश्वस्त कारवाई करेल असे प्रतिपादन केले.
टेलीकॉम सेवा पुरवठादारांना, ऑप्टिकल फायबर चोरी, मोबाईल टॉवर मधील इलेक्ट्रॉनिक्स वस्तू चोरी, फायबर तोडल्या जाणे याबाबत पोलीस विभागाकडून योग्य त्या पातळीवरील सहकार्य संबंधाने बैठकीत चर्चा करण्यात आली. पोलीस विभागाकडून प्रकरणात टेलीकॉम सेवा पुरवठादारांच्या अडीअडचणीबाबत स्वतंत्र नोडल अधिकारी यांची नियुक्ती केली जाईल असे पोलीस विभागकडून बैठकीत सांगण्यात आले.
टेलीक़ॉम सेवांच्या सेवा वृध्दींगत करताना आवश्यक अशा विद्युत पुरवठा संबंधाने आवश्यक त्या सेवांमधील वाढ संबंधाने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमार्फत युध्दपातळीवर सहकार्याचे धोरण असेल असे प्रस्तुत प्रतिनिधींनी टेलीकॉम सेवा पुरवठादार यांना आश्वस्त केले. तसेच आवश्यक त्या यंत्रणांची उपलब्धता होण्यासाठी प्राधिकरण मदत करेल, पायाभूत सुविधांच्या मजबूतीकरणासाठी सर्व संबंधीतांनी सहकार्य करावे, असे आवाहन कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी केले.
सिंहष्थ कुंभ काळातील अमृतपर्व व पर्वनी काळातील गर्दींचे नियोजन, त्याचा मोबाईल नेटवर्क सेवांवरील येणारा ताण निरसण करण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात उभारल्या जाणाऱ्या मोबाईल नेटवर्क जाळ्याची आवश्यकता, त्यासाठीच्या लागणाऱ्या परवानग्या, जागा निश्चीती याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. व त्यानुषंगाने कुंभमेळा आयुक्त यांनी सर्व संबंधीत विभागांना, टेलीकॉम सेवा पुरवठादार आस्थापनांना मदत करण्याबाबत निर्देशीत केले.
कुंभमेळा परिसरातील, पायाभूत सुविधांचे नवनिर्माण, दुरुस्ती, याबाबत त्या त्या विभागांनी टेलीकॉम सेवा पुरवठादारांना, आगाऊ माहिती, प्रत्यक्ष कार्यारंभ करण्याच्या कमीत कमी एक महिना अगोदर सुचना करण्याबाबत निर्देशित केले. ज्यामुळे चालू असलेल्या ऑप्टिकल फायबर सेवा विस्कळीत होणार नाहीत, व प्रत्यक्ष काम सुरु करण्यापुर्वी, सर्व कार्यान्वयन यंत्रणांकडील कंत्राटदार यांनी संबंधीत टेलीकॉम सेवा पुरवठादार यांना कळविण्याची काळजी घ्यावी, असे देखील प्रस्तुत बैठकीत उपस्थितीत विभाग प्रतिनिधींना निर्देशीत करण्यात आले.
या बैठकीस बीएसएनएल, जियो, एअरटेल, व्होडाफोन, जिटीएल, इंडस या कंपनींचे प्रतिनिधी, पोलीस विभागाचे प्रतिनिधी, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, करिष्मा नायर अतिरीक्त आयुक्त, नाशिक मनपा, सा.बां.विभागाचे प्रतिनिधी, ई अँण्ड वाय सल्लागार प्रतिनिधी, उपजिल्हाधिकार शरद घोरपडे, मकरंद दिवाकर, तहसिलदार कुंभमेळा यांची प्रमुख उपस्थिती होती. असे प्राधिकरणाने कळविले आहे.
![]()

