नाशिक (प्रतिनिधी): शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक येथे संविधान मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी संविधान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
सामाजिक न्यायाची खरी शिकवण ही भारताच्या संविधानातून प्राप्त होत असल्यामुळे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग अंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई यांच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शासकीय तांत्रिक विद्यालयामध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थींना सामाजिक न्यायाची खरी शिकवण मिळावी यासाठी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राज्यातील 434 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शासकीय तांत्रिक विद्यालयांमध्ये संविधान मंदिराची स्थापना करण्यात आली आहे .
संविधान मंदिराचे उद्घाटन भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या शुभहस्ते रविवार दिनांक 15 रोजी सकाळी 11 वाजता ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्या अनुषंगाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक येथे दिनांक 12 ते 15 सप्टेंबर या कालावधीत संविधान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
संविधानाच्या विविध पैलूंचे पुस्तक लेखन इत्यादी गोष्टी उपलब्ध करून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पाडण्याचा व संविधानाबाबत प्रशिक्षणार्थीमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. संविधान मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमास नाशिक शहरातील जेष्ठ मंडळी ,उद्योजक ,संविधान प्रेमी नागरिक व पालक आजी-माजी विद्यार्थी यांना निमंत्रित केलेले गेलेले आहे. संविधान प्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने जास्तीत जास्त उपस्थित राहावे, असे आवाहन प्रादेशिक कार्यालय, नाशिक चे सहसंचालक रवींद्र मुंडासे यांनी आवाहन केले आहे .
संविधान मंदिराच्या महोत्सवाचे आयोजन आणि नियोजन संस्थेचे उपप्राचार्य मोहन तेलंगी यांनी केलेले आहे कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संस्थेतील गट निदेशक व निदेशक कर्मचारी वृंद आणि प्रशिक्षणार्थी प्रयत्न करत आहेत.