नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): सध्या नाशिकहून सुरू असलेल्या एकमेव इंडिगोच्या विमानसेवेत शुक्रवारपासून बदल होणार आहेत. हे बदल मार्च महिन्यापर्यंत असतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
सध्या सकाळी ६.४५ वाजता इंदूर येथून विमान निघते आणि नाशिकला ते ७.५० वाजता पोहोचते. तर नाशिकहून सकाळी ८.१० वाजता नागपूरसाठी हे विमान निघते आणि तेथे ९. ५० वाजता पोहोचते.
दरम्यान, आता शुक्रवारपासून त्यात बदल करण्यात आला असून इंदूर येथून सकाळी ९.२५ वाजता नाशिकसाठी विमान निघेल ते ओझर विमानतळावर १०.३० वाजता पोहोचेल. नाशिकमधून १०.५० वाजता हे विमान निघेल आणि १२.३० वाजता पोहोचेल.
नागपूर येथून दुपारी ३.५५ वाजता हे विमान नाशिकसाठी निघेल आणि नाशिकला ५.४० वाजता पोहोचेल तर नाशिकहून इंदोरसाठी ६ वाजता विमान निघेल ते नाशिकला ७.१० वाजता इंदूरला पोहोचेल. २७ मार्चपर्यंत अशा प्रकारचे वेळापत्रक असल्याचे इंडिगोने जाहीर केले.