नाशिक (प्रतिनिधी): एकाच आठवड्यात पंचवटीमध्ये दुसरी जळीत कांडाची घटना घडली आहे, गोदाघाट परिसरात असलेल्या चायनीज गाडी चालक आणि त्याच्या मित्रात वाद होऊन चायनीजच्या गाडीला आग लावल्याचा पोलिसांनी संशय वर्तविला असून त्याबाबत पंचवटी पोलिस अधिक तपास करत आहे.
पंचवटी येथील रामकुंड परिसरात बोट जाळल्याची घटना ताजी असतांनाच गंगाघाट परिसरातील असलेल्या खंडेराव मंदिराजवळील तीन चायनीज च्या गाड्या किरकोळ वादातून जाळल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. चायनीज गाडी चालक आणि त्याचा मित्र या दोघांचे चायनीज खाण्यावरून किरकोळ वाद झाले होते. त्याच वादातून हा प्रकार घडल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून प्रकरणी पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर घटनेबाबत तपास चालू असल्याचे पंचवटी पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी सांगितले आहे.
पंचवटीत घडलेल्या दुसऱ्या जळीत कांडाच्या घटनेनं परिसरात भीतीच वातावरण असून गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा वचक कमी झाला की काय असा प्रश्न निर्माण होतोय.