नाशिक: स्वत: ढोल वाजवत पालकमंत्री दादा भुसे यांनी केला मिरवणूकीस प्रारंभ

नाशिक (प्रतिनिधी): शहरातील भद्रकाली येथील वाकडी बारव येथून गणपती विसर्जन रथ मिरवणूकीची सुरवात राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ढोल, ताशांच्या निनादात व टाळ मृदृंगाच्या गजरात उत्साहात सुरूवात झाली. मिरवणूकीत अग्रस्थानी नाशिक महानगरपालिकेचा शासकीय मानाच्या गणपतीसह शहरातील विविध गणपती मंडळांनी सहभाग नोंदविला.

⚡ हे ही वाचा:  नाशिककरांनो लक्ष द्या ! शहरातील 'या' वाहतूक मार्गांत अतिशय महत्वाचे बदल !

यावेळी आमदार प्रा. देवयानी फरांदे, नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, नाशिक शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी आवेश पलोड, यांच्यास‍ह शहरातील विसर्जन मिरवणूकीसाठी सहभागी गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देत मिरवणूक लवकरात लवकर पुढे नेऊन निर्विघ्नपणे पार पाडावी, असे आवाहन यावेळी मंत्री  दादा भुसे यांनी गणेश मंडळांना केले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक शहरातील सहायक पोलीस आयुक्तांची खांदेपालट

स्वत: ढोल वाजवत पालकमंत्री दादा भुसे यांनी केला मिरवणूकीस प्रारंभ:

सुरवातीला महापालिकेच्या शासकीय मानाच्या गणपतीची मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजा करून आरती करण्यात आली. त्यानंतर थेट मिरवणूकीत सहभागी होवून पालकमंत्री दादा भुसे यांनी स्वत: ढोल वाजवून मिरवणूकीस प्रारंभ केला. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया’ असा जयघोष करत गणपती विसर्जन मिरवणूकीत सहभागी झालेल्या गणेशमंडळांना आणि भाविकांना पालकमंत्री दादाजी भुसे यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच  कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून मिरवणूक शांततेत पार पाडण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री.भुसे यांनी उपस्थितांना केले.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here