नाशिक: गंगापूररोडला दुचाकी झाडावर आदळल्याने चालक ठार…

नाशिक (प्रतिनिधी): गंगापूररोडवरील आनंदवली शिवारात भरधाव दुचाकी झाडावर आदळल्याने ३३ वर्षीय चालकाचा मृत्यू झाला.संदिप रंगनाथ पोटींद (रा. कोळीवाडा, गिरणारे ता.जि.नाशिक) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.

याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोटींदे हे बुधवारी (दि.५) रात्रीच्या सुमारास स्व:ताच्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. काळेनगर कडून गंगापूररोडने तो प्रवास करीत असतांना गुरूजी हॉस्पिटल परिसरातील एव्हरेस्ट स्क्वेअर अपार्टमेंट समोरील गुलमोहराच्या झाडावर भरधाव दुचाकी आदळली.

हे ही वाचा:  नाशिक: खुनातील संशयित 14 महिन्यांनंतर ताब्यात; सिडकोतील 'या' मृत्यूप्रकरणाचा उलगडा !

या अपघातात संदिप गंभीर जखमी झाल्याने चुलत भाऊ गणेश पोटींद यांनी त्यास तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता डॉ.सुनिल मोरे यांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी हवालदार चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस दप्तरी अपघाताची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पवार करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790