नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबांचे क्षेत्र विकसित होऊन अति तीव्र कमी दाबात रुपांतर झाल्यामुळे महाराष्ट्राला पावसाला अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे सध्याच्या हलक्या स्वरूपाच्या पावसापेक्षा २० सप्टेंबरपासून जोरदार पावसाचा अंदाज आहे.
राज्यात १७ सप्टेंबरपासून हलका ते मध्यम पावसाचा अंदाज असून बहुतांश ठिकाणी त्याची तीव्रता कमी राहणार आहे. मात्र, तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळत आहे. २० सप्टेंबरपासून नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, नगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले. १७ सप्टेंबरपासून हिंगोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, बुलडाणा या जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता आहे. मुंबईसह रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता कायम आहे.