खबरदार.. आता गड, किल्ल्यांवर मद्यसेवन केल्यास कायदेशीर कारवाई होणार !

नाशिक (प्रतिनिधी): महाराष्ट्रातील गड, किल्ले हे राज्याच्या सुवर्ण इतिहासाचे साक्षीदार आहेत. त्यांचे पावित्र्य राखणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे.

अशा पुरातन वास्तूंच्या ठिकाणी कोणी मद्यसेवन करून गैरशिस्तीने वागल्याचे आढळून आल्यास महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ अन्वये कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा नाशिकचे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक शशिकांत गर्जे यांनी दिला आहे.

या कायद्यान्वये पहिल्या अपराधास ६ महिन्यांपर्यंत सश्रम कारावासाची आणि १० हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. त्यानंतरच्या अपराधास वाढीव शिक्षेची तरतूद आहे.

गड, किल्ले या ठिकाणी व्यक्ती मद्यसेवन करून गैरशिस्तीने वागताना आढळल्यास नागरिकांनी नाशिक अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या ०२५३-२५८१०३३ या दूरध्वनी क्रमांकांवर तसेच आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई कार्यालयाच्या १८००२३३९९९९ या टोल फ्री क्रमांकावर व ८४२२००११३३ या व्हॉटस्‌ॲप क्रमांकवर संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक गर्जे यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790