नाशिक। दि. २१ डिसेंबर २०२५: लग्न झाल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून विवाहितेचा लग्नात सोने आणि संसारोपयोगी वस्तू कमी दिले या कारणातून नवविवाहितेला घरातील कामाला मज्जाव करत
छळ केल्या प्रकरणी पतीसह सासू व नणंद यांच्या विरोधात म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विवाहितेने दिलेल्या तक्रारीत म्हटले की, २०२३ मध्ये अंबरनाथ मुंबईत लग्न झाले. लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून सासू, नणंद आणि पती यांनी तुझ्या माहेरच्या लोकांनी संसार आणि सोने कमी दिले यावरून रोज टोमणे मारत छळ केला. लग्नात राहिलेल्या वस्तू घेऊन यावे या कारणातून छळ केला. सासरी राहत असतांना सासरच्या मंडळींनी अनेक विवाहितेच्या अनेक गोष्टींवर निर्बंध घातले.
तसेच विवाहिता आजारी असतांना पती जवळच राहणाऱ्या त्याच्या मैत्रिणीला फोन करून तिच्याकडे जात असल्याचे समजले. जाब विचारला तर रात्री उशिरा पर्यंत मारहाण करत असल्याने विवाहितेने घर सोडून देत नाशिकला येथील आई-वडील यांच्याकडे येत पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
![]()

