पश्चिमी चक्रवातामुळे उत्तरेकडून वाहणार थंड वारे
नाशिक (प्रतिनिधी): हिमालयात पुन्हा पश्चिमी चक्रवात येत असल्याने तेथे हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात नाशिक, छत्रपती संभाजीनगरसह ११ जिल्ह्यांत ३ ते ७ जानेवारीपर्यंत थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाज पुणे हवामान विभागातील निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे.
राज्यात ढगाळ हवामान आणि पावसामुळे थंडी गायब झाली होती. मात्र, आता पुन्हा वातावरण कोरडे झाले असून आकाश निरभ्र होत असल्याने हळूहळू थंडीमध्ये वाढ होत आहे. दरम्यान, सोमवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये किमान तापमान १८.१ होते. मंगळवारी ते दोन अंशाने घसरुन १६ पर्यंत जाण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
थंडी वाढणारे ११ जिल्हे:
नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया या ११ जिल्ह्यांत ३ ते ७ जानेवारीदरम्यान थंडीचा कडाका अधिक राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
![]()


