नाशिककरांनो पाणी जपून वापरा; गंगापूर धरणात फक्त इतकेच टक्के पाणीसाठा

नाशिक (प्रतिनिधी): शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाचा जलसाठा २२ टक्क्यांपर्यंत खाली आला असून, धरणाची जलपातळी ६०४ मीटरवर आली आहे. पावसाळा लांबल्यास पंधरा दिवसांनंतर ही पातळी ६०० मीटरच्या खाली आल्यास जॅकवेलपर्यंत पाणी येण्यास अडचण निर्माण होणार आहे.

यामुळे संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर चर खोदून पंपिंग स्टेशनच्या जॅकवेलपर्यंत पाणी आणण्यासह डोहातून पाणी उचलून ते पंपिंग स्टेशनपर्यंत टाकण्यासाठी डिवॉटरिंग पंपिंगचेही नियोजन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सुरू केल्याने शहरावर पाणीकपातीचे संकट घोंघावू लागले आहे.

यंदा मॉन्सूनपूर्व वळवाचा पाऊस तर झाला नाहीच, शिवाय मॉन्सूनही रेंगाळला असून, मृग व रोहिणी नक्षत्रही कोरडे गेल्याने जमिनीतील उष्णता बाहेर काढणाऱ्या पावसाची अद्यापही प्रतिक्षा आहे.

हे ही वाचा:  नाशिक: चिमुकल्याने गिळली विक्सची डबी; श्वास गुदमरला; डॉक्टर देवदूत ठरले, प्राण वाचवले !

या साऱ्या परिस्थितीमुळे जिल्ह्यात, राज्यात सर्वाधिक ५७ टँकरद्वारे ४६ गावे आणि ५२ वाड्यांची तहान भागवावी लागत आहे. त्यातच, जिल्ह्यातील धरणांमध्ये आता केवळ २३ टक्के जलसाठा शिल्लक आहे.

दरम्यान, इगतपुरीच्या ग्रामीण कृषी हवामान केंद्रातर्फे बुधवारपासून (ता. २१) पाच दिवस जिल्ह्यातील काही भागात हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुढील पाच दिवस हवामान ढगाळ राहणार असून, कमाल तापमान ३२ ते ३४ आणि किमान २२ ते २४ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.

हे ही वाचा:  नाशिक: चिमुकल्याने गिळली विक्सची डबी; श्वास गुदमरला; डॉक्टर देवदूत ठरले, प्राण वाचवले !

वाऱ्याचा वेग ताशी २३ ते २५ किलोमीटर राहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. सद्यस्थितीत पाऊस हा मॉन्सूनपूर्व असून, खरीपातील पेरण्यांसाठी शेतकऱ्यांनी मॉन्सूनची वाट पाहावी, असा सल्लाही या केंद्रातर्फे देण्यात आला आहे.

मॉन्सूनचे आगमन झाल्यावर सलग तीन ते चार दिवस पुरेसा म्हणजेच ६५ ते १०० मिलीमीटर पाऊस झाल्यावर आणि जमिनीला वापसा आल्यावर खरीपाची पेरणी करावी, असेही केंद्रातर्फे स्पष्ट करण्यात आले.

हे ही वाचा:  नाशिक: चिमुकल्याने गिळली विक्सची डबी; श्वास गुदमरला; डॉक्टर देवदूत ठरले, प्राण वाचवले !

जिल्ह्यातील धरणांमध्ये गेल्यावर्षी याच कालावधीत २५ टक्के जलसाठा होता. सद्यस्थितीत जिल्ह्यातील काही धरणांमधील जलसाठ्याची टक्केवारी अशी : गंगापूर- ३२, पालखेड- ३६, ओझरखेड- २५, दारणा- २०, मुकणे- ३८, चणकापूर- २८, हरणबारी- ३५, केळझर- ३४, गिरणा- २३, पूनंद- ३४. तसेच जिल्ह्यात ५७ टँकरद्वारे मागील आठवड्यातसुद्धा ४६ गावे आणि ५२ वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात आला आहे. गेल्यावर्षी जूनच्या तिसऱ्या आठवड्यात ९२ गावे आणि १६१ वाड्यांना ८५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790