नाशिक जिल्ह्यात सद्यस्थितीत इतक्या रुग्णांवर उपचार सुरु

नाशिक जिल्ह्यात सद्यस्थितीत इतक्या रुग्णांवर उपचार सुरु

नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख १ हजार ९५९  कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

सद्यस्थितीत ६५० रुग्णांवर उपचार सुरू आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये ४४ ने घट झाली आहे.

तसेच आत्तापर्यंत ८ हजार ६८६  रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा  नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे वेळेत पूर्ण करावीत- अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ३०,  बागलाण ०९, चांदवड २०, देवळा २२, दिंडोरी १९, इगतपुरी ०८, कळवण ०८, मालेगाव ०४, नांदगाव ०८, निफाड ११६, पेठ ०१, सिन्नर ९५, सुरगाणा ०१, त्र्यंबकेश्वर ०४, येवला ३३ असे एकूण ३७८ पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २३३,  मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ०८  तर  जिल्ह्याबाहेरील ३१ रुग्ण असून असे एकूण ६५०  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ११ हजार २९५  रुग्ण आढळून आले आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अमृत स्नानाच्या दिवशी खासगी वाहने शहराबाहेरच थांबणार; नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये ७२ ठिकाणी वाहनतळांचे नियोजन

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी:
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ९७.१० टक्के, नाशिक शहरात ९८.१८ टक्के, मालेगाव मध्ये ९७.१३  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९७.४२  टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७.७३  इतके आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अमृत स्नानाच्या दिवशी खासगी वाहने शहराबाहेरच थांबणार; नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये ७२ ठिकाणी वाहनतळांचे नियोजन

कोरोनामुळे आतापर्यंत झालेले मृत्यू:
नाशिक ग्रामीण ४ हजार २०३ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ३ हजार ९९९ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ३५८ व जिल्हा बाहेरील १२६ अशा एकूण ८ हजार ६८६  रुग्णांचा कोरोनामुळे झाला आहे.

(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून दि. ९ नोव्हेंबर २०२१ रोजी प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790